
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:संग्राम मालू इटग्याळे यांच्या पुरोगामी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील कार्य उल्लेखनीय आहे. आपल्या या कार्याची दखल घेऊन कार्यास अधिक गतिमान करण्यासाठी संधी उपलब्ध व्हावी या हेतुने आपली नियुक्ती भारतीय कम्युनिस्ट पार्टी / भारतीय शेतकरी शेतमजुर युनियन / भारतीय स्टुडंट्स फेडरेशन / भारतीय कर्मचारी संघटन / भारतीय सांस्कृतिक आघाडी / भारतीय युवा आघाडी / भारतीय कामगार संघटन / भारतीय उद्योग आघाडी/भारतीय पत्रकार संघटन / भारतीय चित्रपट संघटन भारतीय शिक्षक प्राध्यापक संघटनच्या देगलूर तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात येत आहे. तरी आपण पक्ष संगटन वाढीसाठी प्रचंड निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे कार्य करावे ही अपेक्षा. सदरील नियुक्ती ही नियुक्ती दिनांका पासुन 03 वर्षासाठी असेल. नियुक्ती कालावधीत आपण पक्ष संघटन वाढीसाठी प्रामाणिकपणे कार्य करावे. करिता आपल्या पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा दिली. त्यांच्या या पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व देगलूर परिसरांमधून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.