
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
नांदेड ग्रामीण चे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या कडून रमेश माळी यांना धमक्या येत असल्याची तक्रार रमेश माळी यांच्या पत्नी सौ.वर्षा रमेश माळी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केलेली आहे.
याबाबत निवेदनात नमूद केले कि,सौ.वर्षा रमेश माळी यांचे पतीला व कुटुंबीयांना सदरील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हे विनाकारण धमक्या व मानसिक त्रास देत आहेत.पोलीस निरिक्षक यांच्या कडून हेतुपुरस्सर दिनांक 04.07.2022 रोजी सिडको ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नं.395/2022कलम379,430,431,432,439,109,34 भा.द.वी.(7) (8)म.ज.म.अधिनियम1966अन्वये तसेच मो.वा.का. कलम 336,177,158,(177) 3(1),181असे अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून माझे पती रमेश गोविंदराव माळी हे दिनांक 5.7.2022पासुन फरार आहेत.तसेच पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या कडून व त्यांच्या मित्र परिवाराकडून जिवे मारण्याच्या धमक्या येत असून रात्री बेरात्री घरी येऊन मला मानसिक त्रास देत आहेत.वाईट नजरेने पाहत आहेत.माझे पती रमेश माळी यांच्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर सिडको ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हे जबाबदार राहतील असे निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची असून चौकशी करून मला व माझ्या परिवारास न्याय द्यावा अशी मागणी रमेश माळी यांच्या पत्नी सौ.वर्षा रमेश माळी यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांना केलेली आहे.