
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
लोहा तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण व शेती व शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या लोहा तालुका कृषी अधिकारी पदी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सदानंद पोटपेलवार रूजू झाले आहेत.
लोहा तालुका कृषी अधिकारी अरुण घुमनवाड यांची लोहा येथून नांदेड येथे नोडेल अधिकारी, उपसंचालक ( कृषी व्यवसाय) जिल्हा प्रकल्प अमंलबजावणी कक्ष जिल्हा स्तर येथे बदली झाल्याने सदरील पद रिक्त होते.
या रिक्त पदांवर लोहा तालुक्यातील विविध ठिकाणी मंडळ अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य करणारे व सोनखेड येथील मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सदानंद पोटपेलवार यांच्याकडे लोहा तालुका कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार दिला असुन ते लोहा तालुका कृषी अधिकारी पदी रुजू झाले आहेत.
लोहा तालुका कृषी अधिकारी पदी सदानंद पोटपेलवार हे रुजू झाल्यानंतर त्यांचा स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा-कंधार विधानसभा अध्यक्ष तथा पत्रकार विलास सावळे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांच्या वतीने शाल पुष्पहार घालून भव्य सत्कार केला.
यावेळी कृषी अधिकारी राम भीसे, कापसी मंडळ अधिकारी बालाजी टेकाळे, अनुरेखक अजित काळेगोरे, काद्री, सुर्यवाड, शिरोळे, हांडे, आदी उपस्थित होते.