
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
दि 27 जुलै 2022 रोजी जि. प. प्रा. शा. पांगरी येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून देशासाठी दिलेले योगदान याविषयी सखोल मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री एम. डी. बटलवाड यांनी विद्यार्थ्यांना केले. ‘मिसाईल मॅन’ म्हणून ते साऱ्या विश्वात प्रसिद्ध झाले. अशा या महान विभूतीची आज पुण्यतिथी. या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भरत पवार, उपाध्यक्ष गणेश बुद्रुक, सहशिक्षक श्री गोंड इ .बी. सर, श्रीमंगले आर. डब्ल्यू. विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.