
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा शहरा नजिक असलेल्या व लोहा न.पा. अंतर्गत येत असलेल्या रमणा तांडा येथील रस्त्यांची व पुलाची अत्यंत दुरावस्था झाली असून याकडे तात्काळ लोकप्रतिनिधीने व प्रशासनाने लक्ष देऊन रस्ते व पुलाचे काम करावे अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख माधव गणेश राठोड यांनी केली आहे.
लोहा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व लोहा न.पा.त समाविष्ट करण्यात आलेल्या रमणा तांडा येथील रस्त्यांची व पुलाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे यामुळे नागरिकांना , लहान मुलांना , विद्यार्थ्यांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे दळणवळणासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून याकडे तात्काळ आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक या लोकप्रतिनिधींने व सिओ, अभियंता या प्रशासकीय अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन रमणा तांडा येथील रस्त्यांची व पुलाची कामे तात्काळ करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे उपशहरप्रमुख माधव गणेश राठोड यांनी दिला आहे.