
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-वारकरी संप्रदायातील संतांच्या मांदियाळीतील ज्येष्ठ संत श्री. सावता माळी यांची ७२७वी पुण्यतिथी
निमित्त कसबा येथील मंदिरात युवा नेते श्री साहिल आप्पा गाढवे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.यावेळी माळी समाज बांधवांच्या वतीने श्री संत सावता माळी यांची प्रतिमा भेट देण्यात आली.तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ संयोगिताताई गाढवे यांच्या हस्ते आरण येथून आणण्यात आलेल्या ज्योतीचे पूजन, समर्थ नगर येथील श्री संत सावता माळी मंदिरात मूर्तीचे ही पूजन करण्यात आले.यावेळी सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील माळी, राम बागडे, नगरपालिकेचे माजी नगरसेवक आश्रुबा नाईकवाडी, अजय अलबत्ते, अक्षय माळी ,सुरेंद्र माळी, धनंजय माळी,दीपक माळी, शहाजी साबळे, तसेच माळी समाज बांधव व शहरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.