
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल दि.पाटणकर
पुणे —स्त्री शक्ती फाउंडेशन व लायन्स क्लब आॕफ पुणे भोजपुर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जहांगीर हाॕस्पिटल यांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड भागात नुकतेच मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
पिंपरी-चिंचवड भागातील शिवाजी पार्क सेक्टर १८ मधील भागात शिवाजी पार्क येथे या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन लायन्स क्लब आॕफ पुणे भोजपुर गोल्ड व जहांगीर हाॕस्पिटल यांच्या सहकार्याने स्त्री शक्ती फाउंडेशन या संस्थेने केले होते.या शिबिरात रक्तदाब तपासणी,रक्तातील साखर तपासणी बाॕडी मास इंडेक्स,ईसीजी तपासणी,हाडांची घनता ,रक्तातील घनता,रक्तातील आॕक्सिजन प्रमाण,संतुलित आहार सल्ला व ह्रदयरोग तज्ञांचे मार्गदर्शन याचा समावेश होता.या शिबिरास प्रामुख्याने रिजन चेअरमन ला.अनिल झोपे, झोन चेअरमन ला.सुदाम भोरे ला.मुरलीधर साठे,ला.मीनांजली मोहिते,मार्केटिंग मॕनेजर जेम्स जेकब ,पत्रकार आत्माराम ढेकळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते श्री चे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करुन योगगुरु अर्चनाताई सोनार यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचे कौतुक करुन संस्थेच्या पुढील कार्यास त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या . प्रसिध्द ह्रदयरोग व डायबेटीज तज्ञ डाॕ.अनु गायकवाड यांनी ह्रदयरोग संबधी विविध बाबीनुसार सविस्तर माहिती दिली.त्यामध्ये ह्रदयरोगाची लक्षणे ,अॕटक येण्याची कारणे,ह्रदयाचे ठोके कसे काम करतात.पंपीग आदी बाबीचा समावेश होता.ह्रदयरोग संबंधी मार्गदर्शन करतांना लायन्स क्लब चे आणि ” निरोगी ह्रदय” मार्गदर्शक राजकुमार राऊत यांनी शिबिरार्थ्यांना स्क्रीनवर ह्रदयरोग संबधी प्राथमिक उपचार व पध्दती दाखवुन तसेच प्रात्यक्षिके करुन दाखविली .या शिबिराचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई सोनार यांनी करुन आतापर्यंतच्या संस्थेच्या विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा दिला. .सुत्रसंचलन सौ.तनुजा राऊत यांनी केले.विविध आरोग्य तपासणीत डाॕ.शिवम,डाॕ.राजश्री ,डाॕ.आशिष तसेच विशाल जगताप,प्रतिक्षा राऊत,रेणुका मेटकर आदींनी सहभाग घेतला.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी स्त्री शक्ती फाउंडेशन संचलीत माहिला समितीचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.शेवटी सौ.सुप्रिया देसाई यांनी आभार प्रदर्शन केले.