
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील सर्व ग्राहकांना दि.20/07/2022 पासुन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे आर्थिक साक्षरता अभियान हे पूर्ण महाराष्ट्रात चेतना सायकल रॅली द्वारे फिरून ग्राहकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच अनुषंगाने दि.26/07/2022 मंगळवार रोजी लोहा येथे दुपारी 4.00 वाजता व्यंकटेश मंगल कार्यालय येथे ही सायकल रॅली आली.सदरिल कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष मिलिंदजी घारड यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.
जनरल मॅनेजर विजय मानकर,चीफ मैनेजर संतोष प्रभावती ,शनमुख वानखेडे,जी.आर. शिंदे,रिजनल मॅनेजर जी.पी. कुलकर्णी,ब्रैंच मैनेजर वैभव कराळे,ऑफिसर आदित्य कुमार, सुप्रिया सूर्यवंशी सेवक नारायण पोलकमवाड , नवनाथ यांसह कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी परिसरातील नागरिक, महिला पुरुष,बॅकेचे सभासद,अन्य बचत गटांसह गौरी महिला बचत गटांच्या सविता सातेगावे,मंजूषा जाधव,गंगाबाई नागलगावे,रेखा मामिडवार,छाया महाबळे, गिरजा काळे,तारामती डुबूकवाड, अर्चना सूर्यवंशी,उषा शिंदे असंख्य महिला बचत गटांच्या शेकडो महिला उपस्थित होत्या.