
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : टिळक स्मारक ट्रस्टकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पारितोषिक समारंभाचे यंदाचे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूडचे आमदार, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत. त्यावरून पुण्याच्या राजकीय वर्तुळात रोहित टिळक भाजपत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, गोव्यात अलीकडेच झालेल्या काँग्रेसच्या संकल्प कार्यशाळेत पक्षाच्या एक व्यक्ती दहा वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर नको या धोरणानुसार त्यांचा प्रदेश कार्यकारिणी पदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळेच रोहित टिळक भाजपत जाण्याचे ठरवले असल्याचे गोव्यातील संकल्प शिबिरानंतर बोलले जात होते. टिळक यांच्या घरच्या कार्यक्रमाला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. त्यावरून पुण्यामध्ये पक्ष प्रवेशा बाबत तर्क वितर्क केले जात आहेत. या बाबतीत टिळक यांचेही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नाॅट रिचेबल मिळतात.