
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर: येथील गोळवलकर गुरुजी प्रा. विद्यालयात आज दैनिक चालू वार्ता या वृत्तपत्राचे प्रथम वर्धापन यानिमित्त मा.तहसीलदार साहेब राजाभाऊ कदम,शालेय समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई अटकळीकर, मुख्याध्यापक दमन देगावकर, अनंतराम कोपले यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप व वृक्षारोपणकरण्यात आले.
या विशेष उपक्रमासाठी दैनिक चालू वार्ता पेपरचे देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे यांनी दैनिक चालू वार्ता पेपर बद्दल मुलांना सविस्तर माहिती देऊन दैनिक चालू आता पेपर शैक्षणिक कार्य पेपर अंतर्गत काय काय उपक्रम राबवले जाते हे तेथील सर्व विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली त्यावेळी देगलूर मधील पत्रकार,विशाल पवार’ ईश्वर देशमुख,शेखर पंतुलवार,धनाजी जोशी,संतोष पैलवार, इसाक मालीपटेल यांची उपस्थिती होती.