
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
कंधार:- जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेशान्वये माहे 12 व 13 जुलै 2022 रोजी कंधार तालुक्यातील बारुळ, कंधार, कुरुळा, फुलवळ,उस्माननगर दिग्रस(बु.),पेठवडज या 7 मंडळात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे नदीकाठ, ओढे /नाले लगत पिकाचे नुकसान पुराच्या पाण्यामुळे झाले असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. शेतीपिकाचे 33% किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शासन निर्णयाप्रमाणे कंधार तालुक्यातील बाधीत शेतकरी यांना मदत देण्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक, यांनी बाधीत शेतकरी यांचे पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे तहसीलदार साहेब कंधार यांनी आदेश दिले आहेत.