
दैनिक चालु वार्ता कोरपना तालुका प्रतिनिधी- प्रमोद खिरटकर
कोरपना तालुक्यातील नांदा फाटा हे औद्योगिक दृष्टीने व्यापार विषयक आणि बाजारपेठेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व मोठे गाव असून शिवाय मुख्य रस्त्याला लागूनच अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मुख्य प्रवेशद्वार असल्यामुळे शिवाय याच मार्गावरून चंद्रपूर या मुख्य शहरांना जाणारी वाहतूक होत असल्यामुळे दळणवळण विषयक फार मोठी समस्या अलीकडे निर्माण झालेली आहे अवजड आणि भरधाव वेगाने धावणारी वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावून असलेल्या छोट्या मोठ्या गाड्या व दुकानदारांनी केलेले रस्त्यावरील अतिक्रमण बाजारपेठेत रस्ता की रस्त्यात बाजारपेठ असे चित्र सध्या पाहायला मिळते विशेष करून सकाळच्या वेळेला कारखान्यांमध्ये कर्तव्यावर जात असतानाच्या वेळेदरम्यान रस्ता ओलांडणे ही तारेवरची कसरत असते शिवाय याच परिसरामध्ये शाळा महाविद्यालयाचे बस्तान मोठ्याप्रमाणात असल्याकारणाने आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, शिवाजी महाविद्यालय, प्रभू रामचंद्र महाविद्यालय, गुरुकुल महाविद्यालय, माऊंट पब्लिक स्कूल, शिव वैभव व एकलव्य पब्लिक स्कूल, क्रांतिवीर साळवे विद्यालय प्रियदर्शनी विद्यालय जवाहरलाल नेहरू विद्यालय व जिल्हा परिषदेच्या तीन शाळा तिथे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाच हजाराच्या जवळ असल्याने व विशेष करून प्रत्येक शाळेच्या बस फेऱ्या सायकल ने वा इतर वाहनाने येणारे विद्यार्थी यांना तर कमालीचा त्रास सहन करावा लागतो वाहतुकीची झालेली कोंडी बघता दिवसाला या परिसरात किरकोळ अपघात होत असल्याचे चित्र बघायला मिळते अनेकांना तर कायमचे अपंगत्व सुद्धा आलेले आहे तर अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला याचेच उदाहरण दिल्यास सण 1992 मध्ये पाच शाळकरी विद्यार्थ्यांचा अपघाता दरम्यान मृत्यू झाला या सर्व सबबीखाली तालुक्यातील पोलीस प्रशासनाला अनेकदा विनंत्या करण्यात आ ल्या मागण्या करण्यात आल्या शिवाय अनेकदा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या या सर्वांना प्रतिसाद देत आठवड्यातून एक-दोनदा वाहतूक शिपाई नजरेस पडतो मात्र सध्या स्थिती बघता वाहतूक शिपायाची कायमची नेमणूक करण्यात यावी ही मागणी सध्या जोर धरत असून परिसरात असलेल्या स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत युवक वर्ग जिल्हास्तरावरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतीत निवेदन देणार असल्याचे समजते त्याचा नेमका काय परिणाम होईल याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहेत.