
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
——————————
परभणी : शहरातील कारेगाव रोड, प्रभाग क्र. १५ च्या क्रांती नगर वसाहती मधला रस्ता बनविण्यासाठी परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या अथक प्रयत्नाने सुमारे २३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
काल शनिवार, दि. ३०/०७/२२ रोजी सदर रस्त्याचे उद्घाटन आ. पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सुमारे ३० वर्षांपासूनची ही वसाहत या ठिकाणी वसली आहे. सदर रस्त्याची दयनीय अवस्था होती. त्यामुळे नागरिक विशेषतः लहान लहान मुले, वयोवृद्ध महिला-पुरुष आणि आजारी रुग्णांची फारच आबाळ होत होती. हा रस्ता सुधारला जावा, खडीकरण व डांबरीकरण करुन नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी जनतेतर्फे सातत्याने मागणी लावून धरली होती.
आश्चर्याची व चीड आणणारी बाब म्हणजे या भागात भाजपाचे पाच नगरसेवक अआहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी या समस्येकडे कधीच लक्ष दिले नसल्याच्या तक्रारी लोकांनी आ. पाटील यांच्याकडे अनेकदा केल्याचे समजले.
आ. पाटील यांनी तेथील जनतेची गंभीर समस्या ध्यानी घेऊन लोकसेवा हीच ईश्वर सेवा यांचे मर्म ओळखले व या लोकहिताच्या कामाला लवकरात लवकर प्रगतीपर चालना मिळावी यासाठीचे प्रयत्न जोमाने सुरु ठेवले होते. कार्यतत्पर व कर्मठ लोकसेवक म्हणून ख्याती असलेल्या आमदार पाटील यांनी अखेर श्रीफळ वाढवून केलेले उद्घाटन लोकाभिमुख असेच ठरले गेले आहे.
या प्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रमुख डॉ. विवेक नावंदर, उपशहर प्रमुख मारुती तिथे, सन्मानार्थ काळे, विभाग प्रमुख उध्दव मोहिते, पण
राग प्रमुख राजू काळे, शाखा प्रमुख महेश तांबे, युवा अधिकारी ऋषीकेश सावंत, नंदीची पानपट्टे, काष्टगावचे सरपंच अरुण बोचरे यांच्यासह असंख्य नागरिक क्रांती नगर महिला मंडळाची आवर्जून उपस्थिती होती.