
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा : – सतत पडणाऱ्या पावसामुळे लोहा तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले पिकांची प्रचंड नासाडी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलझळके निवेदनाव्दारे मागणी केली आहे
वास्तविक पाहता तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून अद्याप लोहा तालुक्यात लोकप्रतिनिधी व तालुक्यातील कोणताही शासकीय कर्मचारी अद्याप बळीराजाच्या बांधावर पोहचलला नाही आपण या सर्व गोष्टींकडे तात्काळ लक्ष देऊन तालुक्यासह जिल्हाभरात सरसकट पंचनामे करायला लावुन शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रूपये नुसकान भरपाई ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलझळके यांनी निवेदनाद्वारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे.