
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर दि.३१/०७/२०२२ पंधराव्या मिनी व चौथ्या चाईल्ड राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा औरंगाबाद येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात दि. 23 ते 25 जुलै 2022 रोजी संपन्न झाल्या. यामध्ये लातूर जिल्ह्याचे मिनी गटाचे व चाईल्ड गटाचे खेळाडू सहभागी झाले होते. आपल्या मेहनतीच्या व प्रशिक्षकांनी दिलेल्या कौशल्याच्या बळावर लातूरच्या फेन्सरनी मुले व मुली दोन्ही गटात जनरल चॅम्पियनशिपची द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली. यामध्ये चाईल्ड गटात इप्पी वैयक्तिक -१)शेख मुजेफा – गोल्ड २) स्वामी अर्नव – ब्राँझ ३)कराड आदित्य- ब्रॉझ , मुलीमध्ये १ )फातिमा शेख -ब्राँझ पदक मिळवले. तसेच सेबर वैयक्तिक प्रकारात १ ) विराज कदम याने ब्राँझ पदक मिळवले त्याचप्रमाणे संस्कृती शिंगळे आणि वेदांत माने. हे सर्व खेळाडू नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात पात्र ठरले आहेत . मिनी गटांमध्ये मुलींमध्ये सेबर व इप्पी या दोन्ही प्रकारात वैयक्तिक खेळात स्नेहा कश्यप हिन गोल्ड मेडल मिळवले . तीही राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे . सांघिक प्रकारात १ )इपी मुले – सिल्वर २ )सेबर मुले -सिल्वर ३ ) फाईल मुले – ब्राँझ मेडल पटकावले यात वेदांत माने,ऋषिकेश गुणाले,आयुष बेंबडे ,भागवत कदम ,श्रीकर शिंदे ,आर्यन कश्यप यांनी उत्तम कामगीरी केली तर मुलींनी १ ) इप्पी व २ ) सेबर प्रकारात ब्रॉंझ मेडल पटकावले. यात संस्कृती शिंगडे ,आकांक्षा फजगे,भक्ती बिराजदार यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन केले. या सर्वांनी लातूर जिल्हा तलवारबाजी खेळास मोठे यश मिळवून दिले. त्यांना वजीरोद्दीन काझी , वैभव कज्जेवाड , मोसीन शेख , रोहित गलाले , आकाश बनसोडे , मैफूजखान पठाण यांचे योग्य व तंत्रशुद्ध प्रशिक्षण लाभले. या त्यांच्या अमूल्य कामगिरीबद्दल लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रा.श्री अभिजीत मोरे,सचिव तथा श्री.शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा.श्री.दत्ता गलाले , तलवारबाजी जिल्हा संघटनेचे सर्व सदस्य ,महात्मा फुले विद्यालयाचे मु. अ. श्री काबरा , यशवंत विद्यालयाचे मु.अ.श्री. गंपले , अहिल्यादेवी विद्यालयाचे मु. अ. श्री. प्रशांत माने , किलबिल नॅशनल स्कूलचे संस्थापक श्री. ज्ञानोबा भोसले , जय हिंद स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्य यांनी कौतुक केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .