
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
गंगापूर (दि.१) : शिंगी येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे संत तुकाराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रतिमा पूजनांनंतर महापुरुषांच्या जीवनावर आधारित कथा विद्यार्थ्यांने आपल्या भाषणातून मांडल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद सोनवणे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री गजानन हरकळ यांची उपस्थिती होती.
यावेळी सोनाली नरोडे व इयत्ता 10वी च्या विद्यार्थिनी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर पोवाडा सादर केला.
वक्तृत्व स्पर्धेत कोमल मापारी, तेजस्विनी साळुंखे, स्वाती संबळे, स्वाती आरण, जानकी को-हाळे, ईश्वरी शिंदे, कावेरी काकडे, कोमल पवार यांनी यश संपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी नरोडे व आभार कु. सना शेख हिने केले. यावेळी श्री सुरेश चव्हाण, श्रीमती मंगल जाधव, श्रीमती कल्पना उरणकर, श्री गोकुळ काकडे, श्री कैलास बनकर, श्री संदीप सावंत, श्री हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती.