
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी वाडा -मनिषा भालेराव
वाडा तालुक्यातील गोऱ्हे येथील कुंभार आळीतील हेमंत गाडेकर यांच्या घराला रविवारी रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गॅसच्या सिलेंडरचाही स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते.सुदैवाने जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी वाडा पोलीस तात्काळ पोहचले होते तर बोईसर येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली आहे.