
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात भुकंप सुरू आहेत. संपुर्ण देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष देखील महाराष्ट्र राज्याकडे लागले आहे. कधी नव्हे तर या राजकीय भुकंपामुळे महाराष्ट्राची ओळख आ tvता जगभर प्रसिद्ध झाली आहे. या राजकीय भुकंपामुळे अनेक दिग्गज भाजपच्या गळाला तर काही दिग्गज शिंदे गटाच्या गळाला लागत आहेत. नेमके असे राजकारण का घडत आहे, याबद्दल राज्यासोबत देशातील जनता देखील चिंताग्रस्त झाली आहे. यातच प्रखड व स्पष्ट बोलणारे नांदेड जिल्ह्याचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची या राजकीय घडामोडीमुळे प्रकट मुलाखत घेऊन नांदेडच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याबद्दल विचारणा करण्यात आली. ज्यामध्ये खा. चिखलीकर यांनी स्पष्टपणे व दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावर त्यांनी महाराष्ट्रात जे काही चालले आहे, ते एका दिवसाचे, सहा महिन्यांचे नसून अनेक वर्षांपासून पक्षामध्ये होत असलेली कुंचबना व यावर झालेला शिंदे गटाचा निर्णय हा योग्यच असल्याचा खुलासा देत विद्यमान मुख्यमंत्री शिंदे हे कट्टर शिवसैनिक तर आहेतच, पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांचीखर तर त्यांना मंत्री पद होते, जायची गरज नव्हती. परंतु मंत्री पद हे सर्वस्व न मानता होणारा अन्याय व सततची अपमानास्पद वागणुक यासोबतच सर्वसामान्यांना न मिळणारा न्याय या अशा विविध बाबींमुळे शिंदे यांना एकट्यानांच नाही तर अनेक आमदारांना देखील अशा प्रकारची वागणुक मिळत असल्यामुळे कदापि शिवसेनेचे सर्व आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. मला तरी वाटतं एका दृष्टीकोनातून हे सर्व बरोबर आहे. आता या पाठोपाठ शिवसेनेचा खासदार गट देखील शिवसेना विरोधात तयार झाला आहे. अर्थातच नक्कीच यामध्ये काही तर दोष असतील म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात असे घडत आहे. पुरस्थितीबद्दल भाष्य करत असताना विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी दौरा करत असून तात्काळ मदतीसोबतच सर्वसामान्यांची कामे देखील मोठ्या प्रमाणात करतअसल्याचे समोर येत आहे. यात तिळमात्र शंका नाही. विरोधी पक्षाचे काम हे विरोध करणे, त्याच्याबद्दल भाष्य करणे मला तरी योग्य वाटत नाही. त्यामुळे अतिवृष्टी काळात कोण अगोदर पोहचलं, कोण नंतर पोहचलं हे जनतेला माहित आहे, असे स्पष्ट करत नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. या जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला काँग्रेसची बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. असे असताना विधानसभेमध्ये मविआ सरकारमधील माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण हे विधानसभा ठरावाच्या दिवशी गैरहजर राहिले. यावर भाष्य करताना खा. चिखलीकर म्हणाले की, अशोकराव चव्हाण आता लवकरच भाजपात येणार आहेत. अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असले तरी गैरहजर प्रकारावरून त्यांची कुंचबना होत असल्यामुळेच भाजपात येण्याचा निर्णयते लवकरच घेतील, असा गौप्यस्फोट देखील खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुलाखतीदरम्यान केला. यामुळे मात्र मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्र देखील चव्हाण यांच्या प्रवेशामुळे हादरेल, असे वाटते का? खर आहे. श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांचा कालखंड काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात सक्रीय राहिला. मोठमोठ्या पदावर केंद्रात काम केले. यामुळे चव्हाण कुटूंबाची ओळख देशाला मोठ्या प्रमाणात आहे. निश्चितच या प्रवेशामुळे अनेकांना धक्का बसणार आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही. सोबत हे सरकार अडीच वर्षे नक्कीच टिकेल यातही तिळमात्र शंका नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखतीत स्पष्ट मोकळेपणाने उत्तर दिल्यामुळे लवकरच दुसऱ्या भुकंपाची आशा व उत्सुकता नांदेडच नव्हे तर संपुर्ण देशाला या गौप्यस्फोटावरून लागल्याचे समोर येत आहे.