
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
राजूरा
पेसा अंतर्गत येणाऱ्या गावामधे आधीच शिक्षणाचा प्रसार कमी व दारिद्र्य जास्त असल्याने त्या भागात दारू भट्टी व विदेशी दारू दुकाने असल्याने नागरिक तसेच त्यांच्या मुलावर त्याचा परिमाण होताना दिसत आहे.
एकीकडे देशात स्किल इंडिया कडे देश वळत असताना आदिवासी भागात जाणून बुजून देशी विदेशी दारूच्या दुकानांना परवानगी देऊन आदिवासी समाजाला नशेच्या आहारी लावून आदिवासींना संपवण्याचा प्रयत्न करत आहे की काय असे चित्र दिसत आहे.
पेसा कायद्याची अंमलबजावणी करून पेसा क्षेत्रात असलेल्या सर्व देशी विदेशी दारू दुकानांना बंद करण्यात यावे अशी मागणी आज मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ.नाना पटोले , जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांना संतोष कुळमेथे, अभिलाष परचाके,गणेश मडावी,अरुण कुमरे,प्रमोद कुमरे, रंजना किनाके,रेखा कुमरे, प्रीती मडावी, निर्मला मेश्राम, वर्षा आत्राम,तसेच बिरसा क्रांती दल चंद्रपूर च्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली