
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
१ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे खंबीरपणे सांगणारे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक श्री एम .डी .बट्टलवाड यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य टिळक यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोंड सर यांनी केले या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत दादा पवार व तसेच उपाध्यक्ष गणेश पाटील बुद्रुक शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच शाळेच्या शिक्षिका श्रीमंगले उपस्थित होत्या.