
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- अनिल पाटणकर
आंबवडे येथील प्राचीन नागेश्वर मंदिर आणि परिसर साफसफाई व स्वच्छता मोहीमेचे आयोजन
भोर – हिंदु संस्कृतीमध्ये श्रावण महिना अतिशय पवित्र समजला जातो महाराष्ट्रासह संपुर्ण देशात या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी असंख्य भाविक भक्त शिव शंकराची मनोभावे पूजा करीत असतात त्याचप्रमाणे भोर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प ज्या पवित्र भूमीत केला त्या श्रीक्षेत्र रायरेश्वर आणि त्याच्याच पायथ्याशी असलेल्या आंबवडे येथील प्राचीन नागेश्वर मंदिराला पर्यटक आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने भेट देत असतात ही बाब लक्षात घेऊन स्वराज्यभुमी प्रतिष्ठानकडुन नुकतीच या मंदिरासह परिसराची साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.
आंबवडे येथील नागेश्वर मंदिर हे पांडवकालीन असल्याचे बोलले जाते घनदाट झाडीमध्ये असलेले प्राचीन शिवमंदिर,नंदिमहाराज आणि मंदीराशेजारील देवकुंड यासोबतच मंदिराशेजारून अविरत वाहत असलेला ओढा आणि मनमोहक धबधबा,झुलता पुल दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांसह भाविक भक्तांचा नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतो मात्र नुकत्याच झालेल्या प्रजन्यवृष्टीमुळे मंदिर परिसरात अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली होती याशिवाय पाण्यासोबत वाहून आलेला पालापाचोळा,माती,दगड यामुळे मंदिर परिसराची दुरवस्था झाली होती मात्र स्वराज्यभुमी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंदिर,दिपमाळ यासह परिसराची साफसफाई व स्वच्छता करून आवश्यक त्या ठिकाणी तणनाशक व किटक प्रतिबंधक औषधांची फवारणी केली याशिवाय मंदिर परिसरात लाईटची व्यवस्थाही करण्यात आली.
या यशस्वी मोहीमनंतर उपस्थितांनी वनभोजनांचा आनंद लुटला. यामध्ये मुक्ती मैत्रकूल गुरुकुल परिवार चिखलगाव यांनी श्लोक, हिंदूंचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीते, शेतकरी गीते सादर करीत वातावरण अजूनच भक्तिमय आणि प्रसन्न करून टाकले याप्रसंगी मार्तंड देवस्थान जेजूरी चे विश्वस्त साँलीसिटर प्रसादजी शिंदे.काका कुडले.संतोषदादा शेडगे.रणजित जेधे.हनुमंत धुमाळ.भाऊ गाडे.आंबवडे गावचे सरपंच रामदास जेधे.व नागेश्वर मंदिराचे पुजारी.ग्रामस्थ आणि स्वराज्यभुमी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.