
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर.
हे निवेदन केंद्रीय मंत्री श्री, जी .किशन. रेड्डी,सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार ,नवी दिल्ली, यांना दिले आहे अधिक माहितीसाठी मा.जिल्हाधिकारी ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्यातील तीन खासदार,स्थानिक आमदार, भारतीय पुरातत्व खात्यातील अधिकारी मुंबई व दिल्ली, या सर्वांना ही निवेदन दिले आहे.
गेले दोन-तीन वर्ष अतिवृष्टीचा फटका पन्हाळगडावर झालेला दिसतो त्यामुळे अनेक तटबंदी कोसळली आहे.तसेच मुख्य पन्हाळ्याचा रस्ताही खचला होता. या ठिकाणी गेल्या दोन-तीन वर्षात २० ते २५ ठिकाणी तटबंदी ढासळत आहे.यासाठी लक्ष वेधण्यासाठी पन्हाळ्यातील १०० ते १५० गावकरी व आजी-माजी नगरसेवक यांनी निवेदन देण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी या ठिकाणी आज जमले होते.
निवेदनात असे म्हटले आहे की, पन्हाळा पोरानिक काळापासून ऐतिहासिक असा महत्त्वाचा किल्ला आहे १९५४ साली पन्हाळ्यात गिरिस्थान नगरपालिका स्थापन झाली आहे. महाराष्ट्रात राज्यातील सर्वात लोकवस्तीचा असा हा किल्ला असून थंड हवेचे ठिकाण राज्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ. असा या किल्ल्याचे नावलौकिक आहे. भारतीय पुरातत्व खात्याने याकडे पुरेसा निधी नसल्यामुळे तसेच कर्मचारी वर्ग नसल्यामुळे स्वच्छतेवर दुर्लक्ष झाले आहे. गेल्या आठ दहा वर्षात गडाची डागडुजी झालेली नाही आहे. तसेच गडावर शेकडो वर्षापासून लोकवस्ती आहे राजाभोज पासून छ.शिवाजी महाराज ,छ, संभाजी राजे, यांच्या इतिहासाचा साक्षीदार असा हा गड आहे, महाराणी छत्रपती ताराराणी यांची करवीरची राजधानी हा गड होता. त्यानंतरच्या काळात ग्रामपंचायत , गिरिस्थान नगरपरिषद आहे, यथे लोक वस्ती असल्यामुळे व स्थानिक प्रशासनाचे पन्हाळगडावर सर्व इतिहास वास्तू सुस्थितीत आहेत. ज्या गडावर प्रशासन नाही आहे. लोकवस्ती नाही आहे. त्या गडावर ची अवस्था जमीन उध्वस्त अशी आहे. गडाची तटबंदी वर जे धनाध्य अशा सावकारा नी तडबंदीवर फार्म हाऊस बांधले आहेत ते अतिक्रमण काढावेत. पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी इतिहासप्रेमी,शिवभक्तांसाठी, मार्ग तटबंदीवरून मोकळा करावा. पुरातून खात्याच्या दुर्लक्ष झालेले तसेच दोन तीन वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे गडाची पडझड झाली आहे . हि वस्तुस्थिती नाकारता येत नाही याबाबत नागरिकांनी पन्हाळातील तडबंदी ऐतिहासिक इमारतीची झालेली पडझड असा अहवाल छायाचित्र चित्रपट तयार केलेला आहे.या अहवालावरून गडाची झालेली पडझड वस्तुस्थिती समजून येईल असेही निवेदनात सांगण्यात आले आहे. योग्य पद्धतीने दुरुस्त जसेच्या तसे व्हावे अशी अपेक्षा आहे असे निवेदनात म्हटले आहे . वरील सर्व मागण्या ३० सप्टेंबर पर्यंत पूर्ण व्हाव्यात नाहीतर मोर्चा ,आंदोलन, उपोषण, इत्यादी विविध मार्गाने अवलंब करून निधी उपलब्ध होत नाही.तोपर्यंत पाठपुरावा केले जाईल . पन्हाळाची जी दुरावस्था झाली आहे.त्या आम्ही गावकरी गप्प बसणार नाही असे या निवेदनात आहे .केंद्रीय मंत्री यांनी निवेदनाची सहानुभूतीपूर्वक विचार करून भारतीय पुरातत्त्व विभागाला आदेश द्यावे. असे निवेदनात सांगण्यात आले आहे.
यावेळी माझी नगरसेवक , रवींद्र तोरसे यांनी “जिल्हाधिकाऱ्यांना असे सांगितले की, सध्या दहा-बारा वर्ष पुरातत्व खात्याची पन्हाळा गडावर संपूर्ण दुर्लक्षित झाले आहे,फारच पडझड होत आहे.याची आम्हाला गावकऱ्यांना फार दुःख आहे.शासनाने तात्काळ यावर लक्ष घालावे हे पडझड थांबवण्यासाठी योग्य ते उपाय योजना कराव्यात गडावर लोक राहत असल्यामुळे गडाची अवस्था सुस्थितीत आहे काही बाहेरचे लोक येऊन पोस्टरबाजी करून पन्हाळ्याची बदनामी करत आहे त्यांच्यावर आळा घालण्याची गरज आहे तसेच स्वच्छतेच्या संदर्भात पन्हाळा हा अनेक वेळा भारतात क्रमांक मिळवणारा गाव आहे “. माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी यांनी “गडावरच्या ज्या वास्तू आहेत ज्या शिल्लक आहे राहत्याल्या लोकांच्या पूर्वजांनी लक्ष देऊन सुस्थितीत ठेवले आहेत. तसेच अनेक संघटना येऊन पन्हाळावर हे करू नका ते करू नका व्यवसाय मनाई करत आहेत. जे वाईट आहे ते बंद झालीच पाहिजे परंतु सामान्य कुटुंब जे मिळून खात आहे त्यांच्या पोटावर गदा आणि चुकीचे बाहेरचे लोक या ठिकाणी पोस्टरबाजी करत आहेत, पन्हाळा हे काय पिकनिक पॉईंट आहे का. तसेच या संघटना गडावर येऊन धार्मिक-जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे,त्यांच्यावर आळा बसणे गरजेचे आहे.”
यावेळी पन्हाळातील माजी नगराध्यक्ष. विजय पाटील , चंद्रकांत गवंडी, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, चैतन्य भोसले, मंदार नायकवडी ,अमित पवार, सचिन पाटील, काशिनाथ बुरुड, इब्राहिम काझी, तय्यब मुजावर,राजू नगारजी, शाहरुख मुजावर,विनायक गोलूवडेकर ,मिलिंद बांदिवडेकर,तसेच गावातले युवा वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले होते, पन्हाळ्यातील गाईड बशीर मुक्तवल्ली, युवा पत्रकार सचिन वरेकर उपस्थिती होत.