
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
करमुक्त स्थानिक डेअरी व कृषी उत्पादने ह्यावर लादलेल्या जीएसटीमुळे महागाईत झाली वाढ
चंद्रपूर
वाढत्या महागाईमुळे सर्वं सामान्य जनता त्रस्त असतांना जनतेला पुन्हा महागाईच्या खाईत लोटण्यांचा निर्णय परत घेण्यात आला असून दि.१८जूलै पासून आता अनेक दैनंदिनी वस्तुंसाठी नागरीकांना अधिकचे पैसै मोजावे लागत आहे.आजवर करमुक्त असलेल्या स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने यावर देखिल जीएसटी लादण्यांचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे महागाईत साहजिकच वाढ होणार आहे.ही अवाजवी दर वाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी नुकतीच जिल्हा चंद्रपूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे मार्फत शासनाकडे एका निवेदनातून करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन सादर करतांना जिल्हाध्यक्ष (पूर्व)पी.एस.गोंगले , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविताताई गौरकार , महानगर अध्यक्षा तनुजा रायपूरे , अल्का मोटघरे , एस.यु.भगत , ऄ.जे .रायपूरे ,राहूल गौरकार , राजू अलोणे ,रेखा उमरे, विभा पाटील ,मधूकर वानखेडे ,रमेश ठेंगरे ,इंदुताई डोंगरे आदीं वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.