
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा – लोहा तालुक्यासह राज्यभरात पावसाने थैमान घातले असुन अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले . महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करा असे आदेश दिले. पण लोहा तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला केराची टोपली दिलेले चित्र स्पष्ट दिसुन येत आहे .
सुरूवातीला शेतकऱ्यांने कमी पावसावर कशीबशी पेरणी केली. शेतकरी पहिल्यांदाच अडचणीत होता पण जुलै १ रोजी सुरूवात झालेला पाऊस २० ते २२ दिवस सतत पडल्याने तालुक्यातसह जिल्हाभरात अतिवृष्टी झाली यामध्ये शेतकऱ्यांची मुग उडीद सोयाबीन , तुर कापुस अशी अनेक पिके भुईसपाट खरडुन गेली या सर्व बाबींचा विचार ललोकप्रनिधी अद्याप केलेला दिसत नाही कारण शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप कृषी अधिकारी तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे करण्यासाठी फिरकलेच नाहीत त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांत चिंतेचे व नाराजीचे वातावरण निर्माण झाले असुन संबंधित पिकांचे पंचनामे होणार कधी अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातुन पहावयास मिळत आहे.
लोहा तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्ते , पुल , विज , अनेक प्रश्न प्रलंबित असुन या सर्व येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत लोकप्रतिनिधी धडा शिकवु अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेतुन व शेतकरी वर्गातून ग्रामीण भागातुन मिळत आहे.