
दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड: येथील प्रचंड सभा म्हणजे गद्दार म्हणणाऱ्यांना प्रतिउत्तर असल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लगावला. जनसामान्यांना न्याय देत त्यांच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या नेत्याचाच मागे इतकी जनता असते हे आमदार अब्दुल सत्तार यांनी दाखवून दिले. स्वागत व सभेसाठी इतका मोठा जनसमुदाय पहिल्यांदाच पहिला असून उपस्थित जनसमुदाय पाहून पंढरपूर ची आठवण झाल्याचे सांगत येथील उपस्थिती पाहता मी माझे भाग्य समजतो अशी भावना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी व्यक्त केली.
यावेळी मी प्रास्ताविक पर भाषणात मुख्यमंत्र्यांनी केलेली मदत आणि सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात विकास कामांसाठी दिलेला भरीव निधीची उपस्थितांना माहिती देत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सिल्लोड शहराच्या दौर्यावर होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व प्रवेशद्वाराचे लोकार्पण, स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे लोकार्पण, नगर परिषद प्रशासकीय इमारत, नगर परिषद प्रशाला बांधकाम व नॅशनल सूतगिरणीचे भूमिपूजन तसेच शिवस्मारक, भीमपार्क आणि 665 कोटी रुपयांची वॉटर ग्रीड आदी विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याहस्ते संपन्न झाले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम, माजी मंत्री उदय सामंत, अर्जुनराव खोतकर, प्रा. सुरेश नवले, आमदार संजय गायकवाड, आमदार बालाजी कल्याणकार , आमदार संतोष दानवे, माजी खासदार सुरेश जाधव, सिल्लोडच्या नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, सोयगाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर आबा काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, केशवराव तायडे,आजी जि.प.किशोर बलांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई पवार, तालुकाप्रमुख दीपाली भवर, रेखाताई वैष्णव आदीं शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.