
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
“””””””'”“””””‘”””‘”””””””””””””‘””””””””””””””””””””
दि १/०८/२०२२ रोजी तहसील कार्यालय आर्णि येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. आर्णी तालुक्यामधील शेतकरी संकटात सापडला आहे. सुरवातीला जून महिन्यात पावसाचे पाणी नियमित न आल्याने शेतकऱ्यांना दुबार,तिबार पेरणीचे संकट आले होते.आणि नंतर जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात संततधार पाणी आल्याने अनेक शेतकऱ्याच्या शेत्या बुडीत गेल्या.अनेक पिके अति पावसाने करपून गेली.
तसेच प्रशासनाकडून पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी लावलेल्या यंत्रावरून काही मंडळामध्ये पाण्याची टक्केवारी कमी असल्याबाबत शेतकऱ्यांचा समज झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील काही मंडळ सुटणार असल्याची चर्चा आहे परंतु प्रशासनाचे इलेक्ट्रॉनिक यंत्रात बिघाड असू शकतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामा करण्यात यावा.शेतकऱ्याचे १००% नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांना कुठलेही निकष न लावता सर्वंकष नुकसान भरपाई देण्यात यावी.नुकसानभरपाई न दिल्यास शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामा करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा याकरिता निवेदन देण्यात आले. त्यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते मा. किसनभाऊ राठोड (जिल्हा उपाध्यक्ष विमुक्त भटके आघाडी यवतमाळ )मा.श्री प्रकाश निळकंठ राठोड -जिल्हा अध्यक्ष विमुक्त भटके.श्री.प्रकाश राठोड -युवा मोर्चा जिल्हा सचिव भाजपा नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.