
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :-
आयएनएस तरकश या युद्धनौकेवर, तिच्या लांब पल्ल्याच्या परदेशातील तैनातीदरम्यान, 29 आणि 30 जुलै 2022 रोजी उत्तर अटलांटिक महासागरात फ्रेंच नौदल जहाजांसह सागरी भागीदारी सराव (MPX) करण्यात आला.
तरकाश आणि फ्रेंच फ्लीट टँकर एफएनएस सौम यांच्यात समुद्रात तेल पुरवठा संदर्भात सराव करण्यात आला. यानंतर सागरी पाळत ठेवणारे विमान फाल्कन 50 सह, संयुक्त हवाई मोहिमेद्वारे अभ्यास करण्यात आला. अनेक सिम्युलेटेड मिसाईल एंगेजमेंट आणि हवाई संरक्षण कवायती करण्यात आल्या.
या सरावांचे यशस्वी आयोजन हे दोन नौदलांमधील उच्च व्यावसायिकता आणि परस्पर कार्यक्षमतेचे प्रतीक आहे.