
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
जिल्हापरिषद सदस्या भक्ती वलटे यांच्या वाढदिवसा निमित्त वाडा तालुक्यातील कोणसई गावातील मेघावले पाडा येथील(दि १ ऑगस्ट) रोजी जिल्हापरिषद शाळे तील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्याचे वाटप करण्यात आले.
कोणसामई येथील मेघवाले पाडा येथील विद्यार्थ्यांना कंपास पेटी, स्केच पेन आदी शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, प्रशांत पाटील, महेश मोकाशी, कांचन मोकाशी, भूपेश मोकाशी, महेंद्र टोके, शैलेश गहिले, योगश सुरूम तसेच मेघवाले पाड्याचे प्रतिष्ठित वेक्तीमत्व गणपत मेघवाले उपस्थित होते, शाळेचे मुख्याध्यापक गुरुनाथ लहांगे, सहशिक्षक, बळवंत पाटील यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.