
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी माकणी-गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी ता. लोहारा तालुक्यातील माकणी येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी केले.योग्य शिक्षण माणसाला माणूसपण बहाल करते.
योग्य शिक्षण माणसाला माणूसपण बहाल करते
समाजातील दरी भरून काढण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला जागृत व्हावं लागेलं. आणि आपल्या पाल्यांना तळमळीने शिकवावं लागेल तेंव्हाच समाज म्हणून आपण प्रगत होऊ असे प्रतिपादन ॲड. दादासाहेब जानकर यांनी केले
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन माकणी येथे करण्यात आले होते. तसेच ध्वारोहणाचा ही कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला उपस्थित अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटी चे अध्यक्ष जालिंदर वाघमारे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव वाघमारे, प्रमुख अतिथी रसूल सय्यद आणि प्रमूख वक्ते म्हणून ॲड. दादासाहेब जानकर यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाला बालाजी शिंदे,बाजीराव शिंदे, दिलीप वाघमारे,अशोक वाघमारे, अविनाश वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, निलेश शिंदे, खंडू कांबळे,कपिल वाघमारे, महेश शिंदे, विकी वाघमारे, गणेश वाघमारे,आकाश शिंदे, आकाश वाघमारे, अमर वाघमारे, शेखर कांबळे, राम मिसाळ, शुभम वाघमारे, अभिषेक गवळी, जीवन कांबळे, पैनू शिंदे आदी समाजातील मान्यवर, ज्येष्ठ मंडळी, आणि तरुण तसेच पत्रकार गणेश मुसांडे या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश शिंदे यांनी केले तर आभार दिपक गायकवाड यांनी मानले. आणि कार्यक्रमाची सांगता केली.