
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
लोहा मतदार संघाचे भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पार्टी चे युवा नेते जिल्हा बँकेचे संचालक प्रविण पाटील चिखलीकर त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोहा येथे भारतीय दूरसंचार मंडळाचे सदस्य सल्लागार तथा माजी सरपंच साहेबराव काळे मित्रमंडळाच्या वतीने शाल पुष्पहार घालून फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून पेढा भरवून जंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे,भारतीय दूरसंचार मंडळाचे सदस्य सल्लागार तथा माजी सरपंच साहेबराव काळे,शेलगावचे सरपंच मारोतराव पाटील, प्रतिष्ठित व्यापारी गोपिनाथराव मुळे, रंगनाथ भुरे वाळकेवाडीकर, सुधाकर ताटे, मुरली डांगे, बबनराव ताटे, आनंदराव घोरबांड ( सचिव बाजार समिती), यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्वांनी प्रविण पाटील चिखलीकर यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून मान सन्मान केला.