दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
अग्रलेखांचा बादशहा व आजच्या युगातील अग्रणी वृत्तपत्र दैनिक नवाकाळच्या मालक व जहाल संपादिका रोहिणी खाडिलकर-पांडे यांचा दैनिक चालू वार्ता चे परभणी प्रतिनिधी दत्तात्रय वामनराव कराळे यांनी परभणी येथे यथोचित सन्मान केला.
नुकताच होऊन गेलेला संततधार पाऊस, मेघ गर्जनांसह विजांचा कडकडाट परिणामी शेती, शेतकरी व उभ्या पिकांचं झालेलं अतोनात नुकसान, जागोजागी जळालेली पिकं, मेटाकुटीला आलेला शेतकरी व त्याचा परिवार, एका बाजूला बैंकांच्या कर्जापायी उध्वस्त झालेला शेतकरी फाशी घेऊन संसार उघड्यावर टाकून गेला खरा परंतु त्याच्या अचानक जाण्याने उभ्या संसाराची राख रांगोळी झालेले असे किती तरी कुटुंबं धाय मोकलून रडत आहेत. तर तिकडं सत्तेसाठी पक्ष व नियमांची चाकोरी धाब्यावर बसवून आपपसात भांडणारे कालचे व आजचे सत्ताधारी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सत्ता आम्हाला का त्यांना असे म्हणून भांडत बसले आहेत. त्यांना शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, मजूर या कोणाचे काहीच पडलेले नाही. हे ध्यानी घेऊन कुठे ओला तर कुठे सुखा दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, त्यांचे गा-हाणे वृत्तपत्राच्या माध्यमातून सत्तेच्या मलिद्यासाठी भांडणात मश्गुल शासनाचे, सुस्त प्रशासनाचे लक्ष वेधून फुंकर मारली जावी यासाठी नवाकाळ घ्या संपादिका रोहिणी खाडिलकर-पांडे आज परभणी दौऱ्यावर पहाणीसाठी आल्या होत्या. परभणी जिल्हा स्थानी मराठी पत्रकार परिषद आयोजित पत्रकार वार्तालापसमयी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी सखोल चर्चा केली. त्यावेळी त्यांचे पत्रकारांच्या वतीने शाल व गुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. त्याच औचित्यावर दैनिक चालू वार्ता चे परभणी प्रतिनिधी दत्तात्रय वामनराव कराळे यांनीही रोहिणी रोहिणी खाडिलकर -पांडे यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.
