
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
सुनेगाव – पेनुर रस्त्यासाठी विविध संघटनेचे पालम – लोहा रोडवर लक्ष्यवेधी आंदोलन
लोहा – सुनेगाव – पेनुर हा रस्ता अतिशय दयानिय झाला असुन या रस्त्यासाठी धर्मवीर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा बाळासाहेब जाधव , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोरे , पाटलाचं काळीजचे संस्थापक अध्यक्ष ऋषि पा वानखेडे सत्कर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष ञ्यंबक पाटील शैलेश ढेबरे , ज्ञानोबा पाटील , वैभव जाधव , श्रीकांत चिंचोरे सह परीसरात सुनेगाव भाद्रा पांगरी पेनुर भागातील सामान्य जनतेने हे आंदोलन पालम – लोहा रोडवर लोकशाहीच्या मार्गाने केले या आंदोलनाला कसल्याही प्रकारचे गालबोट लागले नाही विशेष म्हणजे या आंदोलनात प्रवासी वर्गाने विशेष सहभाग घेतला त्यामुळं हे आंदोलन लक्ष्यवेधी झाले.
लोहा तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दैनिय अवस्था झाल्याने वाहान धारकाला रस्त्यावरुन वाहान चालवताना जिव मुठीत धरुन वाहान चालवावे लागत आहे.
तालुक्यात प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीला जागा दाखवण्यासाठी पालम ते लोहा रस्त्यावर तीव्र आंदोलन आम्ही करत आहोत असे प्रतिपादन यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिले
लोहा तालुक्यात गेल्या महिण्यात संततधार झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळणी झाली आहे.ग्रामीण भागातील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली आहेत तर काही रस्ते जिल्हा परिषद नांदेड विभागाच्या मार्गदर्शनाखाली आहेत पण दोघांच्या हेवेदाव्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दैनिय अवस्था पाह्याला मिळत आहे. वाहान धारकाला व पायी चालणाऱ्या नागरिकाला रस्त्यावरुन जाने जिकिरीचे झाले आहे. वाहान धारकाला रस्त्यावरुन वाहान चालवण्यासाठी मोठी गोछी होत आहे.रस्त्यातील खडा चुकवण्यासाठी वाहाने समोरा समोरून कट मारण्याच्या नादात एकमेकांवर धडकण्याचे अनेक प्रकार बघायला मिळत आहेत आशा घटनेमुळे अनेक नागरिकाला दवाखाण्यातील उपचारांचा अमाप पैसा द्यावा लागत आहे व हि दुखापत सहन करावी लागत आहे. तालुक्यातील खराब रस्त्यासाठी सामाजिक संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
हे आंदोलन आम्ही लोकशाहीच्या मार्गाने केले तातडीने दोन दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास दिनांक १३ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर अमर उपोषणचा इशारा धर्मवीर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा बाळासाहेब जाधव यांनी यावेळी दिला