
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
▪️शेतकऱ्यावर दुहेरी संकट शेतातील पिकासह पशुधनाची ही हानी.
लोहा तालुक्यातील आडगाव येथील शेतकरी मोहणराव क्षिरसागर यांची मैस शेता लगट असलेल्या नदीकाठी चरत आसताना अचानक आलेल्या पुरात वाहुन गेली व दुसऱ्या दिवशी तब्बल २४ तासा नंतर शेती पासुन आर्ध्या की. मी अतंरावर मृत अवस्थेत आली.
लोहा तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी असलेले मोहणराव शामराव क्षिरसागर हे दि ३/८/२०२२ रोजी स्वत:च्या शेता मध्ये जनावरे चारत असताना शेतीलगट असलेल्या नदीला अचानक मोठ्या पुर आल्याने नदी काठी चरत आसलेल्या ८० हजार रू किमतीची मैस वाहुन गेली दिवसभर मैसीचा शोध घेतला पण रात्र झाल्याने मैसीचा शोध लागला नाही तर दुसऱ्या दिवशी शेता नजिक आर्धा की.मी अंतरावर मृत अवस्थेत आढळून आली सदरील बाबीची माहिती लोह महसूल विभागास दिली असता सध्याचे तलाठी यांनी मरत पावल्या मावशीचा पंचनामा करून अहवाल सादर केल्याचे म्हटले आहे.
सध्या शेतकरी अतिवृष्टीसह इतर कोणत्या संकटात होरपळत असताना जुन महिन्यात कमी पाऊस झाल्या नंतर ही शेतकऱ्यानी निसर्गाच्या भरोशावर समाधान कारक पाऊस होईल या आशेने उसनवारी करुन पेरणी केली आणी निसर्गाने हुलकावणी देत अतिवृष्टी होऊन पेरलेल्या जमिनीकडून नेली त्यात भर की काय निसर्ग शेतकऱ्याच्या पशु धनावर ही घाला घालत असुन , शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे एक तर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याची बा-बियाण्यासह जमीन ही खरडुन गेली,शासणाच्या वतीने कोणती ही नुस्कान भरपाई मिळत नाही,त्यात भर पशु धनावर संकट यामुळे शेतकरी हातबल झाला असुन, शासणाच्या वतीने तात्काळ अतिवृष्टीत नुकसान झालेल्याना व मैस वाहुन गेल्या शेतकऱ्याना तात्काळ मद्दत मिळावी अशी मागणी बाधीत शेतकऱ्यातुन होत आहे.