
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यातील निरा नृसिंहपूर येथील मंजूर पोलीस स्टेशन कार्यान्वित करून त्याचा कारभार हा इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा पोलिस स्टेशन मधून चालविण्यात यावा यासाठी शेतकरी संघर्ष समिती बावडा यांच्यावतीने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक(SP) मा.डॉ.अभिनव देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
इंदापूर पोलीस स्टेशनचे विभाजन करून नवीन निरा नृसिंहपूर पोलिस स्टेशन निर्माण करण्यास दि.१३ डिसेंबर २०२१ ला शासनादेशानुसार मान्यता देण्यात आली आहे.या निर्णयामुळे नव्याने ५५ पोलीस स्टाफ, ३ जीप व ३ मोटरसायकली उपलब्ध होणार आहेत. यामुळे खोरोची पासून निरा नरसिंहपुर पर्यंतच्या २५-३० गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बावडा व आसपासच्या कित्येक गावांमध्ये गेली कित्येक वर्षे वीज मोटारी चोरी, महागड्या केबल, पशुधन, दुकान फोडी आदी गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे.त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बावडा पोलिस चे संख्याबळ कमी पडत असून,नीरा -नृसिंहपूर येथील मंजूर पोलीस स्टेशन कार्यान्वित करून त्याचा कारभार बावडा पोलिस स्टेशन मधून चालविण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समिती बावडा यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.पंडितराव पाटील , धैर्यशील पाटील, पवनराजे घोगरे, शशिकांत आगलावे, सचिन सावंत, विजय गायकवाड, सुरेश शिंदे, विजय घोगरे, तुकाराम घोगरे, युन्नुस मुलाणी, संकेत काटकर , महादेव घाडगे , आदी पदाधिकारी उपस्थित होते