
दैनिक चालु वार्ता अतनूर प्रतिनिधी-
येथील गरीब मोलमजूरीदार ज्ञानोबा पांडूरंग मंगले यांचे नुकतेच शॉर्टसर्किटने घराला आग लागून जीवनआवश्यक वस्तूसह ईत्तर नुकसान झालेले होते. याबाबतीत जळकोट तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मारुती पांडे यांना समजताच त्यांनी शॉर्टसर्किटमूळे आग लागलेल्या घरातील कुटुंबाची भेट घेऊन जीवन उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी ५ हजाराची रोख आर्थिक मदत केली. यावेळी अतनूरचे माजी सरपंच रमेश बोडेवार, काँग्रेस युवा तालुका उपाध्यक्ष नितीन सोमुसे, काँग्रेस पक्षाचे तालुका सचिव गोविंद कोकणे, रिपाईचे जळकोट तालुकाअध्यक्ष विनोद कांबळे, यादव केंद्रे उपस्थित होते.यावेळी मारुती पांडे यांनी घराची पाहणी करून एम. एस.ई.बी. व महावितरण च्या अधिकाऱ्यांना फोन लावून या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती केली.तसेच जळकोट पोलीस ठाण्याला फोन लावून तात्काळ पंचनामा करण्याचे विनंती केली.