
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
वाड्यातील भव्य आणि सुसज्ज व शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या व गजबजलेल्या वस्तीमध्ये असलेल्या सुपर मार्केट मध्ये घुसलेल्या तीन अज्ञात महिलांनी एका महिलेची पर्स लंपास जेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
वाडा शहरातील हायकीन सुपर मार्केट मध्ये रविवारी (दि.७ऑगस्ट) दुपारच्या सुमारास खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात घुसूलेल्या तीन अज्ञात महिलांनी येथील एका ग्राहक महिलेच्या जवळ जाऊन त्यांची पिशवी फाडून पिशवीतील पर्स लंपास केली आहे. पर्समध्ये एकूण 12 हजार रुपये रोख, आधार कार्ड व एसटी प्रवासाचे कार्ड होते. हा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी वाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे ग्राहक महिलेचा मुलगा प्रमोद पठारे यांनी सांगितले.