
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-
येथील दि.३१ रोजी सायंकाळी खुशाल विश्वनाथ सोमुसे व मुलगा शंकर खुशाल सोमुसे हा शेतकरी शेतातील कोळपणी करून आपली बैल जोडी घेऊन घराकडे येत असता वाटेतच विद्युत पोल मध्ये वीज प्रवाह उतरल्या मुळे दोन्ही बैलास विजेचा शॉक लागल्यामुळे दोन्ही बैल जोडीचा जागीच मृत्यू मुखी पडले. ही बातमी माजी राज्यगृहमंत्री संजय बनसोडे यांना समजताच त्वरीत शंकर सोमुसे या शेतकऱ्यास ५ हजाराची तातडीची आर्थिक मदत केली. तसेच महावितरण तथा एम.एस.ई.बी.कंपनीच्या अधिकाऱ्यास, जळकोटच्या तहसीलदार यांना बनसोडे आणि युवा नेते चंदन पाटील नागराळकर यांनी फोनव्दारे, भ्रमणध्वनीव्दारे संपर्क करून त्वरीत पंचनामा करून खुशाल सोमुसे व शंकर सोमुसे यांना शासनाची मदत तत्काळ करण्याचे आदेश दिले आहे. बनसोडे यांनी ही आर्थिक मदत आपल्या कार्यकर्त्या मार्फत केली. यावेळी शेतकऱ्यास आर्थिक मदत करत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष तथा अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, माजी सैनिक अयुब शेख, शिवसेनेचे जळकोट उपतालुकाप्रमुख विकास सोमुसे-पाटील, ईश्वर कुलकर्णी, राहूल गायकवाड, प्रमोद संगेवार, गणेश गायकवाड, दत्ता बिचकुंदे उपस्थित होते.