
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
जुलै महिन्यात आणि आॉगस्ट महिन्यात ८ तारखेपर्यंत चालू असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे बळीराजाच्या स्वप्नावर पाणी फिरले आसुन अतिवृष्टी व ढगफुटी सद्रश्य पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले बहुतेक शेती या प्रचंड प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे जमीन खरडुन पिके वाहुन गेले, सोयाबीन, ज्वारी, तुर, मुग, उडिद, कापूस या पिकांना मोठा फटका बसला तर कापूस हे पिके काही प्रमाणात शिल्लक आहेत ते पण सततच्या बरसत आसलेल्या धुव्वाधार पावसामुळे पिवळी पडली असून २२ ते ३० दिवसापासून शेतात बैल औत न गेल्या मुळे तणच या पिकाच्या वर गेले असुन शेतात सतत पडणारे पावसामुळे त्यांची वाढ खुंटली असुन यावर्षी शेतकरी यांना मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया सायाळचे प्रगतीशील शेतीनिष्ठ शेतकरी रामराव पाटील पवार यांनी सदरील प्रतिनिधीशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर अशा या सततच्या पावसामुळे शेती, शेतकरी, पाळीव प्राणी यांच्यावर उपासमारीची वेळ तर येणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करतांना दिसत आहेत, यापुवी अतिवृष्टी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी यांनी विमा कंपनीकडे तक्रार दाखल करा असे आदेश मागील सरकारने दिले होते पण यावषी सतत जुलै व आॉगस्ट च्या ८ तारखेपर्यंत अतिवृष्टी पाऊस होऊनही नव्या शिंदे सरकारने विमा कंपनीला शेतकरी तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश द्यावेत आणि नांदेड जिल्ह्यप्रशासनाने मागणी केलेल्या नुकसान ग्रस्तासाठी २४४ कोटी १८ लाखाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ताबडतोब मंजूर करून अस्मानी संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करतांना दिसत आहेत.