
दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी – दत्तात्रय वामनराव कराळे
**************************
हजारो होतकरु, गोर-गरीब, गरजू, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, पुरुष व महिलांना आपल्या पायावर उभे करणारी गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी लवकरच आपल्या हक्काची सुसज्ज अशी सहकारी बॅंक बनली जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दिलासादायक आश्वासनामुळे उपस्थित नागरिक व सभासदांमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झालेले दिसून आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या टोलेजंग अशा इमारतीला जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसून आले.
सुमारे पाच हजार गरजवंतांना रोजगार मिळवून देणारी ही संस्था खरोखरच नावारुपाला आल्याचे समाधान मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. खासदार हेमंत पाटील व सोसायटीच्या कर्मठ अध्यक्षा सौ. पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून उभारलेली ही आर्थिक संस्था निश्चितपणे नावारुपाला आली आहे. कित्येक कोट्यावधींची उलाढाल, हजारो गरजवंताला मिळत असलेला रोजगार आणि त्यांच्या सर्व परिवारास चरितार्थासाठी मिळणारा औदार्याचा हात या व अशा अनेक बाजू जमेच्या ठरल्या जात आहेत.
त्याचीच परिणीती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही संस्था लवकरात लवकर बॅंकेचा दर्जा घेऊ शकेल असे सांगून राज्य सरकार त्यासाठी निश्चितच प्रयत्न करीन असे ठोस आश्वासन दिले.