
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड शहराचा विस्तार अतिशय झपाट्याने होत असून उत्तर नांदेड मधील तरोडा आणि वाडी या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरीकीकरण झाले असून नांदेड शहरापासूनच अर्धा किंवा एक तासाच्या अंतरावर पुर्णासारखे जंक्शन तसेच वसमत सारखी विकसित बाजारपेठ व इतर क्षेत्रात व कृषी क्षेत्रात परिपूर्ण असलेले गावाचे अंतर लक्षात घेता पूर्ण हिंगोली रस्ते विकास कामासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी भरीव तरतूद केली असून या रस्ते विकास कामासाठी 192 कोटी रुपये ची तरतूद केली आहे.
नांदेड महानगरपालिका अंतर्गत उत्तर नांदेड मतदार संघातील मूलभूत सुविधा हिंगोली व परभणी जिल्ह्याच्या सीमा रस्ते , आलेगाव – निळा – नांदेड तसेच परभणी जिल्हा सीमा ते पूर्णा रस्त्याचे दुपदरीकरण उत्तर नांदेड मधील पासदगाव जवळील आसना नदीवरील पुलाच्या कामाचे प्रातिनिधीक स्वरूपात भूमिपूजन करण्यात आले.
नांदेड मधील भक्ती लॉन्स येथे प्राथमिक स्वरूपात झालेल्या आसना नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या समारंभास हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील तसेच उत्तर नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर , बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र राजपूत व इतर मान्यवर उपस्थित होते
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी नांदेडला जोडणाऱ्या पूर्णा , हिंगोली रस्त्यासाठी 192 कोटी रुपये निधी दिला असून नांदेड शहराच्या रस्ते विकासासाठी शंभर कोटी निधी देण्याचे घोषित केले आहे यारा रस्ते विकास निधीच्या माध्यमातून शहराचा व शहराला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कायापालट होणार आहे