
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : माजी मंत्री आणि शिंदेगटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळ्या जे विद्यार्थी सहभागी होते, त्यांची एक यादी परीक्षा परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीत अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावं आहेत. हीनाकौसर अब्दुल सत्तार आणि उजमा अब्दुल सत्तार यांची नावं या यादीत आहेत. त्यावरून आता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अश्यात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “काही नाही सांगणार सगळे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत. काय सांगायचं काय बोलायचं संपूर्ण जनतेची फसवणूक झाली आहे. ईडी काडी लावून नेत्यांना आत घेतलं गेलं. या सगळ्यांना आता काय बोलायचं सरकार म्हणून काय करत केंद्र काय करत संविधान म्हणून काय सगळी तोडामोड सुरु आहे, असं पेडणेकर म्हणल्या आहेत.
अंबादास दानवे यांनीही सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. “अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्री व्हायचं आहे, सत्तार यांच्याकडेच शिक्षण खातं दिलं तर चांगली चौकशी होईल. 8000 उमेदवारांचा घोटाळा समोर आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे या घोटाळ्यात नाव आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. अब्दुल सत्तार यांचा या TET घोटाळ्यात संबंध आहे का याची चौकशी व्हायला हवी.TET चे बोगस प्रमाणपत्र स्वीकारणाऱ्या संस्थांवर कारवाई व्हायला हवी”, असं दानवे म्हणालेत.