
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी -बाळासाहेब सुतार
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये कुस्ती मल्हानसाठी कुस्त्याचे मैदान भरविनार
गोंदी तालुका इंदापूर येथे कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच कुस्ती शौकीन मल्लांचा कुस्ती आखाडा गोंदी या ठिकाणी भरविण्यात आला.
हजारो पैलवानांनी व कुस्ती शौकिनांनी हाजेरी लावली.
इनाम रुपये शंभर पासून ते एक लाख रुपये पर्यंतच्या कुस्त्या आखाड्यात लावण्यात आल्या, यावेळी नामांकित पैलवानांना चांदीची गदा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,व पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे यांच्या हस्ते देण्यात आली.
पैलवान सरपंच रंजीतबापू वाघमोडे यांच्या वाढदिवसा निमित्त गोंदी यथे भव्य निकाली कुस्तीचे जंगी मैदान पावसाळी वातावरणात सुद्धा रणजीत बापू वाघमोडे मित्रपरिवार यांनी मोठे नियोजन करून मैदान यशस्वीरित्या पार पाडले या कुस्ती मैदानचे प्रमुख पाहुणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे, संचालक रावसाहेब मगर उदयसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे, पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती पिसाळ साहेब, शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पैलवान दीपक काटे, साखर कारखाना संचालक हरिभाऊ घोगरे, संजय बोडके, विलास वाघमोडे, सरपंच शितल मोहिते, अण्णासाहेब काळे, विलास ताटे, चेअरमन निलेश बोडके, असे अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. गोंदी येथील कुस्ती मैदानसाठी पश्चिम महाराष्ट्रातून अनेक वस्ताद उपस्थित झाले . मुलसम्राट रावसाहेब आप्पा मगर, वस्ताद आण्णासाहेब गायकवाड, वस्ताद संभाजी जाधव, मनोहर मेंड, आण्णा नायकवडी, हिम्मत सोलंकर, बासूबाई मुलानी, बेंबळे यथील काका पाटील, बाबू सोनार ,दत्ताभाऊ पांढरे, या कुस्ती मैदान वरती नंबर एकला कुस्ती, माऊली कोकाटे विरुद्ध संतोष जगताप अशी कुस्ती झाली. या कुस्तीमध्ये माऊली कोकाटे विजय झाला नंबर दोन ला कुस्ती भैय्या डांगे विरुद्ध दादा जाधव या कुस्तीमध्ये भैय्या डांगे विजय पैलवान कालीचरण सोलंकर विरुद्ध तामखडे पैलवान कुस्ती बरोबरीत सुटली या कुस्ती मैदान मध्ये पैलवान महेश विचकुले, तेजस काळे, मोईन पटेल, रोहन चिकुटे, आनंदा जाधव, विशाल गरडीक, या पैलवानाने अतिशय चांगल्या पद्धतीने कुर्डूचा शिवम ठाणे प्रेक्षणीय कुस्ती करून विजयी झाला या कुस्ती मैदानमध्ये जय भवानी हलगी ग्रुप बावडा यांनी अतिशय चांगले काम केले कुस्ती मैदानचे निवेदक म्हणून पैलवान युवराज तात्या केचे गारा अकोले अध्यक्ष सोलापूर जिल्हा कुस्ती-मल्लविद्या महासंघ यांनी काम पाहिले. एक नंबरची कुस्ती मैदान मध्ये पंच म्हणून सरपंच बापूसाहेब कोकाटे, बिबीशन सुळ, अमोल गायकवाड, गोविंद पवार, आमर जगदाळे, रोहित जगदाळे, पैलवान दत्ता मगर, वकील राजेंद्र जगदाळे, मयूर घोगरे, दयानंद महाडिक, या नामांकित पैलवानांनी पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी बजावली. पैलवान रंजीत बापू वाघमोडे मित्रपरिवार गोंदी व पैलवान महादेव नाना सूर्यवंशी यांना सहकार्य करणारे सर्व त्यांच्या मित्रपरिवार अतिशय चांगले कुस्ती मैदानाचे कार्य पार पाडले एकी आणि एक वाक्यता असल्यानंतर अशक्य ते शक्य होऊ शकतो हे गोंदीकरांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले.