
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
दहिवडी आगरांच्या वतीने आणि आजी सैनिक संघटनेच्या वतीने नव्यांने दहिवडी आगरांने दहिवडी सोळशी मार्गे मुंबई पंधरा दिवसापासून अशी बस सेवा सुरू करण्यांत आली असून. सदर बसचा मार्ग हा दहिवडी,मलवडी, बुध डिस्कळ, चिंचणी ,भाडळे चिलेवाडी फाटा वाठार स्टेशन, पिंपोडे बुद्रुक सोनके ,नांदवळ, सोळशी वेळे मार्गे पुणे मुंबई एक्सप्रेस असा असून तरी सदर बस ही करंजखोप रणदुल्लाबाद,नांदवळ मार्गे करावी अशी मागणी आता उत्तर कोरेगांव तालुक्यांतील प्रवाशाकडुंन करण्यांत आली आहे. जर ही बससेवा करंजखोप मार्गाने वळवली तर नक्कीच या बसला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळून प्रवाशांना सुद्धा दिलासा मिळणार आहे. सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी गोसावी यांनी करंजखोप मार्गे सदर बस सुरु करण्यासांठी वेळोवेळी सातारा आगर प्रमुखांना विनंतीही केली आहे. तसेच त्यांनी सोनके फाटा येथे दोन दिवसांपूर्वी दहिवडी मुंबई जाणाऱ्या बसच्या चालक वाहकांशी चर्चा केली. यावेळी चालक वाहकांनी सदर बस करंजखोप आणि रणदुल्लाबाद असा उल्लेख नाही यामुळे आम्हांला करंजखोप मार्गे बस वळवता येणार नाही असे चालक वाहक यांच्याकडूंन सांगण्यांत आले.