
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
कर्नाटक भारतीय दलित कोब्रा महत्वाच्या कार्यकर्ते श्रीमती आई अम्मा रंगआप्पा मरकळ यांचे बंगलोर येथे उपचार दरम्यान निधन झाले. गेले बावीस वर्ष आयाम्मा मरकळ यांनी भारतीय दलित कोब्रा झेंडा एकनिष्ठतेने खांद्यावर घेतला व कर्नाटकातील शेकडो दलित आणि आदिवासी नागरिकांना कोब्रा च्या झेंड्याखाली संघटित केले व त्यांचा निवारा व व संरक्षण मिळवून देण्यासाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला त्यांच्यामुळे शेकडो लोकांना निवारा मिळाला व अत्याचार पीडितना न्याय मिळवला त्यांची स्मृती कायम हृदयात राहील त्यांच्या जाण्याने कोब्रा परिवाराचे मोठे नुकसान झाले कोब्रा चे युवा नेते व्यंकटेश मळकर यांच्या त्या मातोश्री होत्या कर्नाटक भारतीय दलित कोब्रा 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करत आहे भारतीय दलित कोब्रा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली उद्या 9/ऑगस्ट 22 रोजी कोकळ जिल्हा यादगिर कर्नाटक येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होतील.