
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी
जि. प. हायस्कूल खानापूर येथे आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक वर्गात बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाल सभेत प्रामुख्याने वर्गातील विद्यार्थ्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे करून प्रतिनिधी स्वरूपाचे सभेचे आयोजन करण्यात आले.
प्रामुख्याने यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कलागुण, व विद्यार्थ्यात नेतृत्व शैली विकसित व्हावी हाच उद्देश होता.
शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान गजलवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रमशील, कार्यतत्पर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे शिक्षक, शिक्षिका यांनी बाल सभेचे यशस्वी आयोजन केले.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेत विविध उपक्रम राबवण्यात येणार असून यातून निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल.