
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
पदयात्रेचे १० वे वर्ष पदयात्रेत दोन हजार महिला – पुरुषांचा सहभाग
देगलूर :- दर वर्षाप्रमाणे यावर्षीही तालुक्यातील करडखेड येथील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिराच्या दर्शनासाठी श्रावण महिनाच्या दुसऱ्या सोमवारी देगलूर ते करडखेड पदयात्रा काढण्यात आली . पदयात्रेचे हे १० वे वर्ष असून सोमवारी सकाळी ८ वाजता बंडयाप्पा मठ संस्थान गांधी चौक येथून पदयात्रेचा शुभारंभ देगलूर-बिलोली मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे,भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजनाने करण्यात आले.यावेळी शहरातील डॉ.सुरेंद्र आलुरकर ,डॉ. विनायक मुंडे,भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजी कनकंटे ,शहराध्यक्ष अशोक गंदपवार,युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम साबणे,अशोक साखरे ,कृउबा चे उपसभापती रवी पाटील, दिगंबर कौरवार , बालाजी थडके , शैलेश उल्लेवार ,प्रशांत दासरवाड,प्रा.उत्तमकुमार कांबळे ,अवधूत भारती,कैलास येसगे,अशोक कांबळे,कृष्णा जोशी,गंगाधर दाऊलवार ,डॉ.रवींद्र भालके,डॉ. राहुल माका ,डॉ.अमित देगलूरकर,डॉ.अवकाश पाटील,सचिन पाटील कारेगावकर,प्रशांत पाटील,अरुण पाटील,मधुकर पाटील,सुभाष पाटील,लक्ष्मणराव मुंगडे,अनिल कमटलवार, संभायाप्पा स्वामी ,अशोक गोपछडे ,सुभाष स्वामी,अनिल कोंडेकर,संतोष आगलावे,विशाल पवार,राहुल पेंडकर, साई गंदपवार, किरण उल्लेवार आदि उपस्थित होते .दरवर्षी हि पदयात्रा शिवभक्त संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येते. बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी, शेतकऱ्यांवरील संकट दूर होण्यासाठी सर्व शिवभक्तांकडून पदयात्रेच्या माध्यमातून करडखेडच्या पूर्वारेश्वर महादेवाला साकडे घालण्यात आले.
देगलूर ते करडखेड शिवमंदिर पर्यंतचा १५ किमी च्या पदयात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बसव जयंती उत्सव समिती देगलूर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य रामदास पाटील, अशोक मजगे, प्रकाशअप्पा कोटचीरकर, संतोष नारलावार ,बल्लूर फाटा येथे नितेश पाटील शिरपुरे , कावळगाव येथे माधवराव येसगे व प्रदीप लगडे,बोरगाव येथे बसवंत गोपछडे, डॉ.विनायक मुंडे ,डॉ. कपिल एकलारे ,डॉ.स्वप्नील कद्रेकर,डॉ. बालुरकर,डॉ.कस्तुरे,डॉ.चिंतलवार,डॉ.अमित देगलूरकर, डाॅ.किरण बिरादार, अनुुप कोडगीरे, बालाजी लटके,आदींकडून पाणी ,चहा,साबुदाणा खिचडी,नाश्ता,फळ इत्यादींचे वाटप करण्यात आले .पदयात्रेच्या सुरुवातीपासूनच रिमझिम पाऊस होता ,तरी शिवभक्त भर पावसात हि पदयात्रेत सामील झाले होते .पदयात्रेत शिव स्तुती गायन-भजन ,या बरोबर महिला भजन मंडळीचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला .गुरुराज माऊली च्या नामस्मरणात पाऊले टाकत ,टाळ-मृदंगाच्या गजरात व -हर -हर महादेव च्या घोषात हि पदयात्रा बंडयाप्पा मठापासून अण्णाभाऊ साठे चौक,देगलूर महाविद्यालय ,होट्टल फाटा,कारेगाव,बल्लूर फाटा,चाकूर फाटा ,कावळगाव ,बोरगाव मार्गे करडखेड येथील पुर्वारेश्वर महादेव मंदिरात दुपारी १२.३० वाजता पोहचली . पश्चात तेथे महादेवाची महा आरती पदयात्रा संयोजक संतोष पाटील व सहभागी शिवभक्तांच्या वतीने करण्यात आली .
पदयात्रेमध्ये शिवभक्तांना त्रास होऊ नये यासाठी देगलूर पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संगमनाथ परगेवार,पोलीस कर्मचारी दीपक जोगे,राजाराम मिरदोडे,शिवानंद तेजबंद,माधव पल्लेवाड,घुले आदींनी चोख बंदोबस्त ठेवला . तसेच देगलूर उपजिल्हा रुग्णालयाकडून शिवभक्तांसोबत औषधी व सोबत डॉक्टर्स,नर्स यांची टीम उपलब्ध करून देण्यात आली होती आणि विक्रम साबणे यांच्याकडून ऍम्ब्युलन्स सेवा देण्यात आली .तसेच देगलूर महाविद्यालयाच्या एनसीसी पथकातील एकूण ३० कॅडेट नि पदयात्रेमध्ये सुव्यवस्था, ट्रॅफिक नियंत्रण व स्वच्छता ठेवण्यासाठी विशेष परिश्रम केले.
पदयात्रा यशस्वी करण्यासाठी संयोजक संतोष पाटील,संदीप पाटील,अशोक इबितवार,सचिन देशमुख,शाहीर माणिक कोकले,सोनू मारकवाड,शंकर यन्नलवार ,विशाल अमृतवार,तुकाराम यन्नावार ,धनाजी जोशी, ,रज्जाक धुंदी,दत्तू पाटील,शिवकुमार पाटील ,भागवत पाटील, दत्तु टोपे, तुकाराम यन्नावार, महिला व पुरुष भजनी मंडळ आदींनी परिश्रम केले.