
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:बिलोली – ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने ७ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित आॅनलाईन कार्यक्रमात कवी शेख शफी बोल्डेकर लिखीत मराठी कव्वाली ” आमचे बाबा मिस्कीनशाहवली या बोल्डागांव येथील प्रसिद्ध सूफी संत हजरत मिस्कीनशाहवली चिश्ती या दर्गावरील कव्वाली व तसेच महाराष्ट्रातील मुस्लिम मराठी संताचा परिचय करून देणारी एकमेव मराठी कव्वाली “आम्ही संत मुस्लिम मराठी ” या दोन मराठी कव्वालीचे नुकतेच लोकार्पण मराठी चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संदिप भुरे आफीशीयल या युट्यूब चॅनेलवर कव्वाली ऐकण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ही बहारदार मराठी कव्वाली प्रसिद्ध कव्वाल सलिम अरमान यांनी गायली असून या कव्वालीला संगीताचा साज ख्यातनाम संगीतकार प्रा. संदिप भुरे यांनी चढविला आहे. यावेळी बाबासाहेब सौदागर यांनी ग. दि. माडगूळकर यांनी १९५५ साली मराठी कव्वाली लिहिण्याचा संदर्भ देऊन पासष्ट वर्षानंतर मी मराठी कव्वाली ऐकतो असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. बोल्डा हे गांव मला तीर्थक्षेत्र वाटते. कारण या गावाने महाराष्ट्राला अतिशय तरल लेखन करणारा प्रतिभावंत दिला आहे. अशा शब्दात शफी बोल्डेकर यांचा गौरव केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष अॅड. हाशम इ. पटेल होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संदिप भुरे, सलिम अरमान, डॉ. सय्यद जब्बार पटेल, जाफरसाहाब शेख, डॉ. महंमद रफी यांची उपस्थिती होती. यावेळी निमंत्रितांचे कवीसंमेलन पार पडले. यात कवी जाफर आदमपूरकर, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, सुरेखा कुलकर्णी, मोहिद्दीन नदाफ, प्रा. पांडुरंग मुंजाळ, जस्मिन शेख, वाय. के. शेख, दिलीप धामणे, मीना तौर, शबानाशेख, अहमद पिरनसाहब शेख, शरयु कुलकर्णी, शिवराज पटणे, तहसीन मसुदअली सय्यद, प्रवीण पगार, उमा किशोर गजभिये, मनोहर
गायकवाड, परवीन कौसर, अनिल नाटेकर, राजू वाघमारे, अनुरत्न वाघमारे, सुरेखा गायकवाड यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवयित्री अनिसा सिकंदर शेख यांनी केले. तर बहारदार सूत्रसंचालन कवयित्री दिलशाद यासीन सय्यद व मलेका शेख यांनी केले. आभार शफी बोल्डेकर यांनी