
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी तालुक्यामधून श्री.ज्ञानदेवजी ढवळे यांची जि.परिषद नियोजन समितीमधे निवड
अमरावती :- जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या आदेशान्वये जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्यासाठी अंजनगाव सुर्जी तालुक्यामधून श्री.ज्ञानदेव नारायणराव ढवळे सरपंच ग्रा
पं.काळगव्हान पं स.अंजनगाव यांची जि.परिषद नियोजन समिती मध्ये निवड करण्यात आली असून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरीय नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून एक सरपंच जि. परिषद नियोजन समितीमध्ये सदस्य निवड करण्यात आली आहे.श्री.ज्ञानदेवराव. ना. ढवळे हे अगोदर विस्तार अधिकारी(पं )होते. 2015 ला ते सेवानिवृत्त झाल्यावर सण 2021 मध्ये झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीत गावकऱ्यांनी त्यांना आग्रहाने उभे केले व भरघोष मतांनी निवडून दिले आणि सरपंच पदाची धुरा त्यांचे हाती दिली . गावचा विकास आराखडाबाबत यांचा दांडगा अभ्यास असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून अश्या अभ्यासू व्यक्तिमत्वांना जि.परिषद नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड होणे हा अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी कौतुकास्पद आहे.तसेच नियोजन समितीमधे प्रतिनिधींची निवड झालेल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.
जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड
अमरावती तालुक्यामधून सौ.मिनाक्षी राजेश कोठे,तिवसा मधून सौ.जयश्री प्रशांत आमले,भातकुलीमधून प्रभाकर भीमराव धंदर,मोर्शी मधून सौ.कल्याणी प्रीतम राजस,वरुड मधून निलेश धारगे,अंजनगाव सुर्जी मधून ज्ञानदेवजी ना. ढवळे,दर्यापूर मधून प्रभाकर भा. कोरपे,नांदगाव खंडेश्वर मधून धनराज इंगोले,चांदूररेल्वे मधून मिलिंद सुधाकर गुजरकार,धामणगाव रेल्वे मधून सौ.ममता मुकेश राठी,अचलपूर मधून मंगेश किसनराव भोरे,चांदूरबाजार मधून दिनेश काळे,चिखलदरा मधून हिराजी पुनाजी जामुनकर,धारणी मधून रामा बाला भिलावेकर इत्यादींची जिल्हा परिषद नियोजन समिती मध्ये निवड करण्यात आली आहे.ह्यानुसार समितीचे वेळोवेळी होणाऱ्या सभेत उपस्थित राहणे आणि बीपीडीपी-२०२१/प्र.क्र.२१/पंरा-६ दिनांक १ नोव्हेंबर २०२१ ग्रामविकास विभाग शासन निर्णयानुसार प्रत्येक सदस्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या असे आदेश जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीमध्ये या दहा विषयांवर होणार चर्चा
१) जिल्ह्यातील दिर्घकालीन विकासाचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद आणि क्षेत्रिय कार्यकारी गटांना सहाय्य करणे.
२) सर्व क्षेत्रिय कार्यकारी गटांचे अहवाल विचारात घेवून प्रारूप जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करणे.
३) विकास क्षेत्राच्या विकासा संदर्भात निरोगी विचार विनिमयास प्रोत्साहीत करणे. ,
४) प्रकल्प तयार करण्यासाठी क्षेत्रीय कार्यकारी गटांना सहाय्य करणे.
५) अतिरोक्त संसाधन जमा करण्याच्या शक्यतांचा शोध घेणे.
६) वेळापत्रकानुसार उपक्रमांची अंमलबजावणी होईल यासाठी योग्य समन्वय राखणे.
७) क्षेत्रिय कार्यकारी गटांच्या उपक्रमांचे संयोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेला सहाय्य करणे.
८) प्रकल्प नियोजनासाठी योग्य अभ्यास करणे व जिल्हा परिषदेला अहवाल देणे.
९) भागधारकांना बँक आणि सहकारी संस्थांशी चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
१०) जिल्हा परिषदेच्या नियोजन प्रक्रियेस सहाय्य करण्यासाठी तज्ञ,स्वयंसेवक,शैक्षणिक,तांत्रिक संस्था शोधणे.