
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
मराठी चित्रपट अभिनेते बंधू प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले 15 वर्षापूर्वी मला भेटण्यासाठी व माझ्याशी बोलण्यासाठी प्रदीप 10 ते 12 दिवस पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर कोर्ट येथे येऊन माझं निरीक्षण करत उभा असायचा माणसाच्या कोडाळ्यात असलेला मी आणी माझी तासनतास वाट पाहणारी माणसं ते भेटल्यानंतर माझ्या पाया पडून हसत जाणारी माणसं तो तासभर बघायचा. तसेच 14 एप्रिल रोजी मी बाबासाहेबांना पाया पडायला हत्तीवर बसून यायचो त्याचे फोटो व व्हिडिओ त्याने काढला—!
एक दिवस मला भेटला 555 सिगरेटचे पाकीट मला दिले त्याचं काम होतं काम झाल्यावर स्वतःची ओळख सांगितली दादा(वडिलांच्या) च्या शेवटचे आजारपणात kem हॉस्पिटलच्या बाहेर त्याने मी व माझ्या साथीदारांसोबत दिवसभर थांबला कोणती घमेंड नाही गर्व नाही अभिमान नाही. खळखळून हसणाऱ्या त्याच्या चेहऱ्यासारखंच त्याचं हृदय
प्रदीप पटवर्धन यांना भारतीय दलित कोब्रा तर्फे भावपूर्ण आदरांजली
भाई विवेक चव्हाण कोब्रा राजे