
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी जांब -किरण गोंड
जागतिक आदिवासी दिनानिमित्त महात्मा फुले पब्लिक स्कूल जळकोट येथील मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महात्मा फुले पब्लिक स्कूलचे प्राचार्य सी एन बिरादार सर , प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विभाग प्रमुख होस्टेलचे अधीक्षक खोकले सर व वरिष्ठ लिपिक एस.पी पाटील सर , प्रवेक्षक किरण गोंड कार्यक्रमाला मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक एच.व्ही गित्ते सर, परमेश्वर मठदुरू सर दयानंद गोंड सर गंगोत्री सर , धनराज अंधारे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख : जाधव सर शिक्षीका : कासार मॅडम एम.व्ही. नारसान्ने , ए व्ही गडदे , जी डी चोले, आचमारे ए.एस , सुर्यवंशी पि.आर. , डांगे एस. बी. , जाधव एस.व्ही. वरील सर्व शिक्षक वृंद यांनी उपस्थिती दर्शविली या कार्यक्रमाचे प्रास्ताविका व सूत्रसंचालन मनोज जाधव सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यार्थ्यांमधून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा तोरकड , नितीन शेळके या विद्यार्थ्यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनाबद्दल व आदिवासी समाजातील जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना भाषण संबोधित करण्यात आले व आदिवासी नृत्य ( तारपा नाच ) सादर करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व श्री मा. खोकले सर व प्राचार्य सी.एन बिरादार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अध्यक्षस्थान समारोह केले , किरण गोंड यांनी आभार प्रकटन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला